Pune : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील खास सभा अर्धा तास झाला तरी सुरूच नाही

विरोधी पक्षनेते यांनी व्यक्त केली नाराजी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील खास सभा सोमवारी (दि. 2 मार्च) आयोजित केली होती. मात्र, अर्धा तास झाला, तरी सभा सुरू झाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 चे 7 हजार 390 कोटींचे बजेट सादर केले. हे बजेट फुगविण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. ही सभा तातडीने सुरू करण्याची विरोधी पक्षांची मागणी आहे. आजच स्थायी समिती अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 असा कालावधी आहे.

दरम्यान, हेमंत रासने यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे नगरसेवक गेल्याने 11.30 पर्यंत सभा सुरू झाली नव्हती. स्थायी समिती अध्यक्षांचा अर्ज भरायचा होता तर मग सकाळी 11 वा. ची वेळ कशाला दिली, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1