Pune : लोहगाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

एमपीसी न्यूज – लोहगाव, वडगाव शिंदे रस्ता, हरण तळे परिसरातील एकूण पाच मिळकतीच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. सुमारे 21,600 चौरस फूट, क्षेत्र मोकळे करण्यात आले. या मिळकतदारांना आधी नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. ही कारवाई कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचे नियंत्रणातर्गत पूर्ण करण्यात आली.

कारवाईत कनिष्ठ अभियंता-किरण कलशेट्टी, दत्तात्रय चव्हाण, मनोजकुमार मते, स्थानिक पोलीस, 10 बिगारी व ज्वा कटर मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. या भागातील घरे, व्यावसायिक गाळे, अशा मिळकती घेण्यापूर्वी नागरिकांनी आपली आर्थिक फसवणूक व नुकसान होऊ नये, याकरिता अशा बांधकामाबाबत सखोल चौकशी करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या भागातील अनधिकृत बांधकामावर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like