Pune : पाणी कपातीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचा कसबा गणपती मंदिरासमोर हंडा मोर्चा

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील अघोषित पाणी कपातीच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसकडून आज मंडई येथील टिळक पुतळा ते कसबा गणपती मंदिरापर्यन्त भव्य हंडा मोर्चा काढला.

यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेस महिला शहर अध्यक्ष सोनाली मारणे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी तसेच आजी माजी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, पुणे शहरात मागील दोन महिन्यापासून पुणेकर नागरिकांना अघोषित पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ज्या पुणेकर नागरिकांनी भाजपला एक खासदार, आठ आमदार आणि महापालिकेत सत्ता देऊन देखील पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली जात नाही. त्याच्या निषेधार्थ आज हंडा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी पुणेकर नागरिकांची पाणी कपातीमधून लवकर सुटका न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.