Pune: मास्क वापरण्यापेक्षा हातरुमाल वापरा : डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी उठसूट मास्क वापरणे टाळावे. त्याऐवजी स्वच्छ हातरुमाल वापरावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले. या मास्कची विल्हेवाट लावणे अवघड होणार असल्याचा इशाराही त्यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

हातरूमाल हा किती तरी पटीने सुरक्षित असतो. किटाणूंपासून बचावासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा, साबणानेच हात धुणे सर्वाधिक फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सॅनिटायझरचा प्रभाव हा 20 मिनिटांपेक्षा जास्त राहू शकत नाही. त्यापेक्षा साबणाने स्वच्छ हात धुतल्यास त्याचा फायदा जास्त आहे. कोरोना पासून सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून दिवसभरात प्रत्येकाने तीन ते चार वेळा साबणाने हात धुवावे. तर, शहरातील काही शाळांनी पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला मास्क आणि सॅनिटायझरसह पाठवावे, अशा सूचना केल्या आहेत. ही सक्ती अतिशय चुकीची असून, त्याची काहीही आवश्यकता नाही. मास्क आणि सॅनिटायझरची शाळांनी केलेली सक्ती योग्य नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित आणखी बातम्या वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.