Pune : क्यूट राहील देशमुखला ‘हॅप्पी बर्थडे’

'Happy Birthday' to cute rahil Deshmukh

एमपीसीन्यूज : ‘तुझे मेरी कसम’ म्हणत त्यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडले. काही वर्षांच्या कोर्टशीपनंतर 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडचे रंगीले कपल म्हणजे रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा यांचा मोठा मुलगा राहील याचा आज वाढदिवस. तो आज चार वर्षाचा झाला. राहीलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  

या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करत अनोख्या रितीने शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राहील बेटा, जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा डॉक्टर येऊन म्हणाले की, शुभेच्छा, तुमच्या घरी सुपरहिरोचा जन्म झाला आहे.

गेल्या वर्षी तू कॅप्टन अमेरिका होतास आणि आता यावर्षी स्पायडर मॅन आहेस. मी विचार करतोय की तुझ्या आईचं नाव जेनेलिया आहे की मार्व्हल?’, अशा मजेशीर अंदाजात रितेशने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटसोबतच रितेशने राहीलचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रितेश- जेनेलियाने २०१२ मध्ये लग्न केलं. सोशल मीडियाद्वारे ही जोडी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. या दोघांना दोन गोंडस मुलं आहेत. रियान आणि राहील अशी या मुलांची नावं असून राहील आता चार वर्षांचा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.