Pune: वॉशिंग सेंटर करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

Pune: Harassment of a married woman for bringing money from father for to start a washing center वॉशिंग सेंटरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये घेऊन यावे त्यासाठी तिच्या पतीने तर तिला बांबूने मारहाण ही केली.

एमपीसी न्यूज- वॉशिंग सेंटरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासू-सासरे, पती आणि इतर सात जणांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2005 मध्ये फिर्यादी महिलेचे लग्न झाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत सासरच्या मंडळींनी पैशाच्या मागणीसाठी वारंवार त्रास दिला.

वॉशिंग सेंटरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये घेऊन यावे त्यासाठी तिच्या पतीने तर तिला बांबूने मारहाण ही केली. तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला.

अखेर हा सर्व त्रास असह्य झाल्याने विवाहितेने बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घोलप करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.