Pune: हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत -सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे माजी संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचे कालचे भाषण ऐकल्यानंतर दुःख झाले. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण, त्यांचा फोन लागला नाही. त्यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेतील एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.