पुणे तिथे सर्व उणे झाले : खासदार अशोक चव्हाण

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या सत्ताधारी भाजपला पाण्याचे नियोजन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या शहराच्या भाजपच्या खासदाराला उपोषणाला बसण्याची वेळ येते. यातून सत्ताधारी भाजपची प्रशासनावर पकड राहिली नसून पूर्वी पुणे तिथे काय उणे असे सर्वजण बोलत असत. मात्र आता पुणे तिथे सर्व उणे झाले आहे, अशा शब्दात प्रदेशअध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष जाहीर सभे दरम्यान प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री शहर अध्यक्ष रमेश बागवे तसेच काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

  • यावेळी प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारकडून नागरिकांना देण्यात आलेली कोणतीही आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले असून देशभरात मोठा गाजावाजा करीत स्मार्ट सिटी योजना राबविली. त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. त्या योजनेतून काय ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळाला का? अशा शब्दात सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.

तसेच चव्हाण पुढे म्हणाले की, पुणे शहरातील नागरिकांवर हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. मात्र, खऱ्या अर्थाने या भाजपच्या खासदारांना आणि आमदारांना हेल्मेट घालण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याने नागरिक त्यांना दगडी मारतील. तेव्हा त्यांना हेल्मेट नक्कीच घालावे लागणार आहे. अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला.

  • चव्हाण पुढे म्हणाले की, भाजप सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यभरात काँग्रेस पक्षाकडून जण संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून जोवर देशातील हे भाजप सरकार पाय उतार होत नाही. तोवर आमचा संघर्ष चालूच राहणार असल्याची भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.