Pune Health : पुणे शहरात गोवरचा धोका वाढला; एका दिवसात 11 बालकांना गोवरची लागण

एमपीसी न्यूज : गोवर आजाराने संपूर्ण देशभरात (Pune Health) थैमान घातला असताना आता पुण्यातही या आजाराने शिरकाव केल्याचे दिसून आले. पुणे शहरात एका दिवसात या आजाराची 11 बालकांना लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एकाच भागातील हे सर्व बालक आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील तब्बल 11 बालकांना गोवरची लागण झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 314 संशयित रुग्ण या आजाराचे सापडले आहेत.

पुण्यातील भवानी पेठ हा मध्यवस्तीत असणारा आणि दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. कोरोना काळात देखील याच परिसरात सर्वात आधी कोरोनाचा उद्रेक झाला होता. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने दाट वस्ती असणाऱ्या भागात तो लवकर पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे गोवरचा संसर्ग होण्याआधी नऊ महिने ते पाच वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांना तातडीने गोवरची (Pune Health) लस देण्यात यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Today’s Horoscope 15 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.