Pune: आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, बेड मिळण्यासाठी रुग्णावर आंदोलन करण्याची वेळ

Pune: health system collapsed, time to agitate on the patient to get a bed न्यूमोनिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला 78 तास आठ हॉस्पिटलमध्ये फिरल्यानंतर ही बेड मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली.

एमपीसी न्यूज- पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असून आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. न्यूमोनिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला 78 तास आठ हॉस्पिटलमध्ये फिरल्यानंतर ही बेड मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली. अखेर अलका चौकात आंदोलन केल्यानंतर त्याला महापालिकेच्या रुग्णालयात बेड मिळाला.

34 वर्षीय रुग्णाला न्यूमोनिया असल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी झाल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत दाखल करून घेण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला.

त्यानंतरही या रुग्णाच्या नातेवाईकांनी बेड मिळवण्यासाठी पुण्यातील सात ते आठ हॉस्पिटल पालथी घातली. परंतु, त्यांना रुग्णालय उपलब्ध झालेच नाही.

अखेर त्यांनी रात्री साडेनऊ वाजता डेक्कन येथील अलका चौकात रुग्णासह ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने धावाधाव करत रुग्णासाठी कुठे मिळतो का याची पाहणी केली. त्यानंतर तब्बल नऊ तासानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.