Pune News : आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गामुळे येणार्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग एक ते चार मध्ये सेवकांची एकूण मान्यता पदांची संख्या सोळाशे एकोणसत्तर इतकी आहे. मात्र केवळ आठशे ऐशी सेवक कार्यरत आहेत म्हणजेच रिक्त पदांची संख्या सातशे एकोणनव्वद इतकी मोठी आहे. कोविड रुग्णालय आणि फ्ल्यू क्लिनिक सेंटरचा वाढता ताण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येतो.’

रासने पुढे म्हणाले, ‘त्यामुळे करार पद्धतीने सेवेत असलेल्या बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ज्युनिअर नर्स, सेवक, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, दंतशल्यचिकित्सक अशा एकूण ७३ सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.