Pune : शहर परिसरात जोरदार पाऊस

Heavy rain in the city area

एमपीसी न्यूज – आज, बुधवारी दुपारी पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी वाहनेही घसरून पडली. त्यामध्ये काही नागरीक जखमी झाले.

पाऊस सुरू असताना सोबतीला गार वाराही होता. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला.  पुणे शहर आणि उपनगरांत सर्वत्र पाऊस सुरू आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येत होते. पण, पाऊस काही येत नव्हता.

आज सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने शहरात हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन पुणेकरांना दिलासा मिळाला.

जोरदार पाऊस झाल्याने उत्साही पुणेकरांनी   पावसात भिजण्याचा आनंद लुटला. जवळपास एक तासाहून अधिक काळ पुणे शहर आणि परीसरात पाऊस सुरू आहे.

दूरपर्यंत जोरात पाऊस सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कोरोनामुळे घरातच बसून असलेल्या पुणेकरांना पावसाने थोडासा दिलासा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.