Pune : सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पुण्यात जोरदार पाऊस; रस्त्यावर साचले पाणी

एमपीसी न्यूज – प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे आज थोडासा गारवा मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. सोबतीला मोठ्या प्रमाणात वाराही असल्याने झाडांची पाने या पावसात वाहून जात असल्याचे चित्र दिसून आले.

आधीच कोरोनाच्या महाभयंकर रोगामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यात पडलेल्या या पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. काही वेळानंतर उनही पडले. त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे का? असा प्रश्न पडत आहे.

पुणे शहरात शिवाजीनगर, बुधवारपेठ, कात्रज, हडपसर, सिहगड रोड, कोथरूड, वारजे – कर्वेनगर, शिवणे, कोंढवा, टिंगरेनगर – विश्रांतवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<