Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने ओढ दिली होती. : Heavy rain in the city and dams since morning

एमपीसी न्यूज – संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळपर्यंत खडकवासला धरणात 23 मिलिमीटर, पानशेत 41, टेमघर 60, वरसगाव धरणांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या चारही धरणांतील पाणीसाठा किंचित वाढला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत एकूण 9.96 टीएमसी म्हणजेच 34.17 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच कालावधीत 28.48 म्हणजेच 97.69 टक्के पाणीसाठा होता.

आज सकाळपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने कामावर जाणाऱ्या पुणेकरांनी रेनकोट, छत्ती सोबत घेऊनच प्रवास सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कधी नव्हे ती पावसाने ओढ दिली होती.

त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे वैतागलेल्या पुणेकरांना आता पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.