Pune Heavy Rain : अतिवृष्टीने पुणेकर हैराण; पोलीस गायब तर रस्त्याला नदीचे स्वरूप

एमपीसी न्यूज : पुण्यात काल (14 ऑक्टोबर) झालेल्या परतीच्या (Pune Heavy Rain) पावसाने पुणेकरांना हैराण करून सोडले. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याने पुण्याच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. हल्ली पुण्यात पाणी साचण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परतीच्या पावसात झालेली अतिवृष्टी पुणेकरांना फारच त्रासदायक झाली.


पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांसह कात्रज, हडपसर, वारजे, तसेच पुणे-नगर रस्ता आणि वडगाव धायरी परिसरातील रस्ते जलमय झाले होते. पुण्यातील पेठांचा भाग, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे चित्र होतं.


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये 74.3 मिमी पाऊस पडला, तर लोहेगावमध्ये केवळ 0.2 मिमी, चिंचवडमध्ये 6.5 मिमी पाऊस झाला. “पावसाच्या जोरदार सरींनी सखल भागात समस्या निर्माण केल्या. आणखी पाऊस पडू शकतो”, अशी माहिती IMD, पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदी पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळली


1. एका ट्विटरकर्त्याने व्हिडीओ शेअर करत म्हंटले (Pune Heavy Rain) आहे, कि अवघ्या तासभर झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर, पुणे हळूहळू राहण्यायोग्य होत आहे का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.


2. अजय यांनी पुण्याच्या वाहतूक कोंडी आणि प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हंटले आहे, कि पुण्यात मुसळधार पाऊस, वाहतूक कोलमडली आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणारे पोलिस सापडले नाहीत. त्यांची कर्तव्ये बदलली आहेत असे दिसून येते. डेक्कनचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हंटले, कि काल मी 4 तासांपेक्षा अधिक वेळेत केवळ 30 किमी प्रवास केला.


3. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांवर संशोधक असणारे विनीत कुमार यांनी म्हंटले आहे, कि पुण्यातील काल झालेल्या ऑक्टोबरच्या पावसाने आता 150 मिमीचा टप्पा ओलांडला आहे. सलग चौथ्या वर्षी शिवाजीनगरमध्ये सरासरीपेक्षा जास्त आणि सलग चौथ्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 100+ मिमी पाऊस पडला आहे. शेवटच्या वेळी 2018 मध्ये ऑक्टोबरमध्ये एकूण पाऊस 100 मिमीपेक्षा कमी होता. शिवाजीनगरमध्ये काल दुपारी 4 वाजेपर्यंत 43 मिमी (Pune Heavy Rain) इतका पाऊस पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.