Pune : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता 

एमपीसी न्यूज- राज्याच्या सर्व भागातील तापमानात प्रचंड वाढ होत असून विदर्भ आणि मराठवाडय़ातील उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली आहे. राज्यात 3 आणि 4 जून रोजी ठिकठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

मध्यंतरीच्या काळात ढगाळ स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाली होती. मात्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे रविवारी उच्चांकी 47 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  मराठवाडय़ात परभणीचे तापमान 45.6 अंशांवर गेले होते. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्वरचे तापमानही सरासरीच्या तुलनेत तब्बल 6 अंशांनी वाढले आहे.

राज्यात आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी महाराष्ट्राच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मराठवाडय़ातील लातूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.