Pune : पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज : – अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे पुणे शहर परिसरात गेल्या तासाभरात झाडपडीच्या जवळपास 25 वर्द्यांची अग्निशमन दलाकडे नोंद झाली आहे.एम्प्रेस गार्डनजवळ चारचाकी वाहनावर झाड पडून अडकलेल्या एका व्यक्तीस जवानांनी बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले असून अग्निशमन दलाचे जवान विविध घटनास्थळी कार्यरत(Pune) आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडपडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.आज दि.(20 मे) रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे पुणे शहर परिसरात जवळजवळ 25 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

सहकार नगर येथील शाहू कॉलेज गेटजवळील वाहनावर  तसेच हडपसर, राम टेकडी येथील उर्दू शाळेच्या घरावर झाड पडले आहे. चंदननगर,कोंढवा खुर्द वानवडी,हडपसर,गुलटेकडी, नाना पेठ(हिंदमाता चौक), गणेश पेठ,मार्केट यार्ड,फातिमा नगर, वानवडी,हडपसर,गुरुवार पेठ,धनकवडी,कात्रज आणि मुंढवा या परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

Pimpri : अनधिकृत होर्डिंगबाबत फौजदारी कारवाई करा

एम्प्रेस गार्डनजवळ चारचाकी वाहनावर झाड पडून अडकलेल्या व्यक्तीचे नाव  ज्ञानेश्वर भासिपल्ले( वय 21,राहणार चाकण) असून यांना ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या हात आणि पायाला मार(Pune) लागला आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share