Pune : अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा विस्कळीत; अनेक रेल्वेगाड्या रद्द

एमपीसी न्यूज – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, ठाकूरवाडी मंकीहील जवळ दरड कोसळली असल्याने पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. लोणावळ्याजवळ अपलाईनवर बोगद्यात दरड कोसळली असल्याने अप, मिडल, डाऊन या तिन्ही लाईन बंद आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या असून काही गाड्या अर्ध्यातूनच मागे फिरवण्यात आल्या आहेत.

सेवा विस्कळीत झालेल्या रेल्वेगाड्या –
# 2 ऑगस्टला सुटलेली भुवनेश्वर – मुंबई (11020) कोणार्क एक्सप्रेस पुण्यापर्यंतच धावणार
# 2 ऑगस्टला सुटलेली तिरूनेलवेल्ली – दादर एक्सप्रेस (11022) पुण्यापर्यंतच धावणार
# 2 ऑगस्टला सुटलेली राजेंद्रनगर पटना – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (13201) देवळाली पर्यंतच धावणार
# 2 ऑगस्टला सुटलेली हावडा – मुंबई मेल (12321) मनमाड पर्यंतच धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली सोलापूर – मुंबई (12116) सिद्धेश्वर एक्सप्रेस दौंड पर्यंतच धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली हुबळी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (17321) दौंड पर्यंत धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली हैदराबाद – मुंबई (17032) ही गाडी दौंड पर्यंत धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली जबलपुर – मुंबई (12187) गरिब रथ एक्सप्रेस नाशिक रोड पर्यंत धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली चेन्नई – मुंबई एक्सप्रेस (11042) पुण्यापर्यंत धावणार
# 3 ऑगस्टला सुटलेली इंदोर – पुणे एक्सप्रेस (19312) ही गाडी सुरत, जळगाव, मनमाड, दौंड मार्गे वळविण्यात आली आहे
# 3 ऑगस्टला सुटलेली मुंबई कोल्हापूर (17411) महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड, कुर्डूवाडी, मिरज मार्गे वळवण्यात आली आहे
# 4 ऑगस्टला सुटणारी पुणे – मुंबई (11010) सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
# 4 ऑगस्टला सुटणारी पुणे – मुंबई (12124) डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – पुणे (11009) सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – मनमाड (12109) पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
# 4 ऑगस्टला सुटणारी मनमाड – मुंबई (पंचवटी एक्सप्रेस) इगतपुरी पर्यंत धावणार
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – बेंगलोर (11301) उद्यान एक्स्प्रेस दौंड पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – हुबळी एक्सप्रेस (17322) दौंड पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – हैदराबाद (12701) हुसेन सागर एक्सप्रेस कुर्डूवाडी पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – राजेंद्रनगर पटना (13202) ही गाडी देवळाली पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – हावडा (12322) ही गाडी मनमाड पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – जबलपुर (12188) गरिब रथ एक्सप्रेस नाशिक रोड पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी मुंबई – चेन्नई मेल (11027) पुण्यापासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटणारी कोल्हापूर – तिरुपती एक्सप्रेस (17416) मिरज पासून सुटेल
# 4 ऑगस्टला सुटलेली पुणे – निजामुद्दीन एसी एक्सप्रेस (12493) रेल्वे गाडी दौंड, मनमाड, खांडवा, भोपाळ, बिना, झांसी, मथुरा मार्गे वळविण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी मुंबई – भुसावळ पॅसेंजर (51153) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी भुसावळ – मुंबई पॅसेंजर (51154) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी मनमाड – मुंबई एक्सप्रेस (12118) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी मुंबई – मनमाड एक्सप्रेस (12117) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी भुसावळ – पुणे एक्सप्रेस (11025) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी पुणे – भुसावळ एक्सप्रेस (11026) रद्द करण्यात आली आहे
# 5 ऑगस्टला सुटणारी मुंबई – कोल्हापूर (17411) महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.