Pune: विजांच्या कडकडाटासह पुण्यात जोरदार पाऊस

Pune: Heavy rains in Pune with thunderstorms

एमपीसी न्यूज – रविवारी सकाळपासून अंगाची लाहीलाही करणारा उकाडा सहन केल्यानंतर अखेर पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सिंहगड रोड, सहकारनगर, पर्वती, बालाजीनगर, धनकवडी, वारजे – माळवाडी, शिवणे भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

शनिवारी रात्री घाबरून सोडणाऱ्या विजांचा प्रचंड गडगडाट झाला. धरण क्षेत्रात दूरपर्यंत जोरात पाऊस झाल्यामुळे रात्री हवेत गारवा निर्माण होऊन थंडी वाजत होती, मात्र आज सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. अंगाची लाहीलाही होत होती. कोरोनामुळेच घरातच बसून असलेल्या पुणेकरांना पावसाने थोडासा दिलासा दिला.

सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाला चांगलाच मातीचा सुगंध सुटला होता. मागील काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. कोरोना नसलेल्या भागांत जोरदार पाऊस झाल्याने अतिउत्साही पुणेकरांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. जवळपास एक तास पुण्यात चांगला पाऊस झाला. सोबतीला गार वाराही आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला.

आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते निसरडे झाले होते. अर्धा मे महिना संपत आला असून कमालीचा उन्हाळा जाणवत आहे. रात्री तर या उकाड्यामुळे झोपही लागत नाही. आज झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यात गारवा निर्माण झाला.

बच्चे कंपनीसह उत्साही पुणेकरांनीही या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. त्यामुळे ज्या भागांत कोरोना नाही त्या ठिकाणी काही काळ नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.