Pune : शहर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील वारजे – माळवाडी – कोथरूड, पौड रोड, सिंहगड रोड, कर्वेनगर, शिवणे, शिवजीनगर, गणेशखिंड रोड, औंध, कुमठेकर रस्ता, अलका चौक भागांत आज (गुरुवारी) सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. सायंकाळी या परिसरात ढगांचा गडगडाट सुरु होता.

आज सकाळ पासूनच कमालीचा उकाळा जाणवत होता. अंगाची लाहीलाही झाली होती. सायंकाळी सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोरोनामुळेच घरातच बसून असलेल्या पुणेकरांना पावसाने पुणेकरांना थोडासा दिलासा दिला.

मागील काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. कोरोना नसलेल्या भागांत जोरदार पाऊस झाला. जवळपास 1 तासापासून पुण्यात पाऊस सुरू आहे. सोबतीला गार वाराही सुटला आहे. आभाळ भरून आल्याने पुणेकरांनाही दिलासा मिळाला. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते निसरडे झाले होते. बच्चे कंपनिसह उत्साही पुणेकरांनीही या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

सध्या अर्धा मे महिना संपत आला असून कमालीचा उन्हाळा जाणवत आहे. रात्री तर या उकाड्यामुळे झोपही लागत नाही. आज झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी 5.30 नंतर हा पाऊस वाढतच गेला. सोबतीला वाराही जोरातच सुरू होता. त्यामुळे ज्या भागांत कोरोना नाही त्या ठिकाणी काही काळ नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.

या भागांत सकाळी 7 ते सायंकाळी 7 असे 12 तास दुकाने उघडी ठेवण्यास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी परवानगी दिली आहे. धारण क्षेत्रांत जोरदार पाऊस सुरूच होता. तर, शिवणे भागातील वीजही पावसामुळे गायब झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.