Pune : पै आयटी ऑलिपिंयाडचा आज पारितोषिक वितरण सोहळा चार विजेत्या विद्यार्थ्याना हेलीकॉप्टर राईड

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स ‘आयोजित ‘पै आयटी ऑलिपिंयाड’ चा आज, गुरुवारी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून चार विजेत्या विद्यार्थ्यांना विमाननगर येथून हेलीकॉप्टरने सोहळ्यास आझम कॅम्पसला आणण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

आज सकाळी 11 वाजता आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉल मध्ये पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. राहुल बक्षी (फोबस क्रिएशन्स मिडिया प्रा. लि. ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

सात प्रदेशातील 270 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 हजार विद्यार्थ्यांनी या आयटी ऑलिपिंयाडमध्ये भाग घेतला असून या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. विजेत्यांना लॅपटॉप,आय पॅड,टॅब आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अमित गाला, हर्षद सांगळे, इरफान शेख, मुमताज सय्यद हे मान्यवरही या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.