pune – पुण्यात हेल्मेट जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली

एमपीसी न्यूज – हेल्मेट जनजागृतीसाठी झेनेक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमीटेड व प्रिमीयर ग्रुप कंपनीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी मिळून आज शनिवारी (दि.12) सकाळी साडेसात ते दहा च्या दरम्यान शहरातील 7 वेगवेगळ्या मार्गांवर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली मगरपट्टा, गोळीबार मैदान, महात्मा गांधी रस्ता, सणस रस्ता, डी.पी.रस्ता, कोथरूड, बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर मार्गांनी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील मैदानावर रॅली एकत्रित आणण्यात आल्या.पुणे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन पराग संचेती, झेनेक्स इनोव्हेशनचे सीईओ अनुज गुप्ता, प्रिमीयर ग्रुपचे मोहनगुप्ता, दिप्तीकेश खोतफोडे, गणेश जामगावकर,इत्यादी मान्यवरांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन आणि जनजागृती केली.

या रॅलीमध्ये तब्बल 1 हजार दूचाकीस्वारांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे आयोजन पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या मार्फत करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.