Pune : हेल्मेट जनजागृतीसाठी 12 जानेवारी रोजी हेल्मेट ड्राईव्ह

एमपीसी न्यूज- वाहतूक नियमांविषयी जनजागृतीच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येत्या शनिवारी 12 जानेवारी रोजी झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर ग्रुपच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रमा अंतर्गत हेल्मेट ड्राईव्हचे आयोजन केले आहे. या उपक्रमास पुणे शहर पोलीस दलाचे सहकार्य लाभले आहे.

ही हेल्मेट ड्राइव पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगगवेगळ्या 6 मार्गाने सीजनस् मॉल मगरपट्टा, गोळीबार मैदान एम जी रोड, सणस ग्राऊंड स्वारगेट, डी.पी. रोड कोथरुड, बालेवाडी आणि अ‍ॅटो क्लस्टर चिंचवड येथून एकाच वेळेस सकाळी साडेसात वाजता सुरु होऊन फेरीचा शेवट पुणे पोलीस ग्राऊंड शिवाजीनगर येथे होईल. अशी माहिती झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर ग्रुपचे सीईओ अनुज गुप्ता यांनी दिली.

अनुज गुप्ता पुढे म्हणाले की, नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, म्हणून सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठीच दुचाकीवरून हेल्मेट ड्राईव्ह काढण्यात येणार आहे. दुचाकी चालकांकडून हेल्मेटचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेटचा वापर करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हेल्मेट राईड काढण्यात येणार आहे. या माध्यमातून हेल्मेटचे महत्व, वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे, नो ओव्हर स्पीडींग, नो ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्हींग, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे, सिट बेल्टचा वापर करणे आदी बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

पुणे शहर वाहतुक नियमाबाबत कसे आदर्श आहे दाखवून देण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर गु्रप ने आयोजित केलेल्या आणि शहर पोलीस दलाचे सहकार्य लाभलेल्या या हेल्मेट ड्राईव्ह फेरी सहभागी व्हा असे आवाहन पुण्याचे आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.

वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) तेजस्वीनी सातपुते यांनी देखील वाहतूक जनजागृती हा उद्देश ठेवून हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी होऊन वाहतूक नियमाबाबत जनजागृती मध्ये हातभार लावा असे आवाहन केले.

हेल्मेट ड्राईव्ह उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी www.10xtrueriders.com या संकेतस्थाळाला भेट द्यावी. नोंदणी निशुल्क आहे. जास्तीत जास्त वाहनचालकांनी यामध्ये सहभागी होऊन जनजागृतीचा संदेश सर्वांना द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.