BNR-HDR-TOP-Mobile

Pune : हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ पोलीस आयुक्त कार्यालयावर दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज- पुणे शहरात 1 जानेवारी पासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणार्‍या दुचाकी चालकावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ आज पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने दुचाकी निषेध रॅली काढण्यात आली आहे. या दुचाकी निषेध रॅलीमध्ये विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी या रॅलीत सहभागी झाले आहेत.

हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकर आणि हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने विरोध प्रकट केला असून हेल्मेटसक्तीचा विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली आहे.

दुचाकी रॅलीमध्ये ‘पुणेकरांचे हाल, पोलीस माला माल’ ‘हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. या निषेध मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

न्यायालयाच्या निकालानुसार राज्यभरात हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराकडून दंडाची कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका ‘हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती’ने घेतली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3