Pune : कोंढवा दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना बिहार सरकारकडून 2 लाखांची मदत

मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा

एमपीसी न्यूज- पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेत 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची गंभीर दखल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील घेतली असून घटनेतील; मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना बिहार सरकारतर्फे मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like