Pune : ‘लाॅकडाऊन’ काळात विविध ठिकाणी ‘सामाजिक संस्थां’ची गरजूंना मदत

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या व गरजू आणि गरीब लोकांना मदतीचा ओघ सगळी कडून सुरू आहे. या कामात स्वयंसेवी संस्था आघाडीवर आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जमेल तशी मदत पुरवण्याचे ही मंडळी काम करत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, रेशन, मोफत जेवण यासारख्या मदतीचा यामध्ये समावेश आहे.

बाणेर व बालेवाडी येथे गरजू लोकांना व पोलिसांना मदत
बाणेर व बालेवाडी येथील यश चंद्रकांत मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त आज बालेवाडी मध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवाना पानी व कोल्डड्रिंक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सोहम मुरकुटे, गणेश तापकिर, तेजस बालवडकर, प्रतिक धेंङे, अभिषेक ववले, आदिक मोहिते, नितीन बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘खाना बचाओ,खाना खिलाओ’ कडून अन्नधान्य किटचे वाटप
‘खाना बचाओ-खाना खिलाओ’ या संस्थेच्या वतीने लॉक डाउन मुळे गरीब व गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्याचे सुमारे हजारो किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव विनोद बंसल व अध्यक्षा डॉ प्रियांका बंसल यांच्या पुढाकारातून हे वाटप करण्यात आले. या अन्नधान्य किटमध्ये 4 किलो तांदूळ, 1 किलो पिट, अर्धा किलो दाल, 1 किलो मीठ,अर्धा किलो साखर, एक पाव कांदा लसुन चटनी मसाला, तीन पाकीट बिस्किट आणि अर्धा किलो गोड तेल यांचा समावेश आहे.

‘कर्तव्य’च्या माध्यमातून 250 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पुण्यातील चार युवक डॉ. गौरव सोमाणी, रोहित राठी, विशाल मोदी, विनीत राठी यांनी एकत्र येत पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देऊ केला आहे. याप्रसंगी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते वडगाव शेरी भागातील 250 गरजू कुटुंबांना आज या कीटचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या किट मध्ये, तांदूळ, तेल, लाल मिरची पावडर, मीठ, साबण यांबरोबरच इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

‘पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरम’कडून गरजूंना मदतीचा हात
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमकडून ‘डोनेट अ मील’ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना सॅनिटायझर, मास्क व जेवणाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे मंगेश काटे, लॉईटस दास, शेखर मेहता, सुनील बिडलाम यांच्या पुढाकाराने व लायन्स क्लब आणि रोटरी क्लबच्या मदतीने आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मिलिंद दातार, कीर्ती दातार, लायन्स क्लब आकुर्डीचे हिरामन गवई, रोटरी क्लब लोकमान्यनगरचे टीना रात्रा, फ्युजन स्पाईसचे नवीन राय, विराज चव्हाण, न्यू प्रशांत एन्टरप्राईजचे प्रशांत आदी मान्यवर उपस्थित होते.

या अंतर्गत शहरातील विविध भागात अनेक गरजू नागरिकांना, कुटुंबांना रोज चहा, नाष्टा, जेवण याची सोय करण्यात येत आहे. नुकतीच पोरवाल रस्ता येथे 15 गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणामालाचे वाटप करण्यात आले. या बरोबरच शहरातील येरवडा व विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचे वाटप देखील करण्यात आले आहे. जागोजागी थांबलेल्या पोलीस कर्मचा-यांना नारळपाणी, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करुन ते करत असलेल्या कामाचे फोरमच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.