Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने उद्या भरणार अर्ज; काँगेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे हेमंत रासने सोमवारी (दि. 2 मार्च) अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवाराबाबत उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनासोबत आल्यास महाविकास आघाडी होणार असल्याची महापालिकेत चर्चा सुरू आहे.

या पदासाठी निवडणूक येत्या 6 मार्चला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 मार्च आहे. ‘पीएमपीएल’च्या नयना गुंडे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष निश्चित मानला जात आहे.

अध्यक्षपदासाठी पुन्हा हेमंत रासने यांनाच संधी मिळाली आहे. ते आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.