Pune : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, आमदार सुनील कांबळे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. उभे राहून, हात वर करून, प्रभागाचे नाव सांगून सदस्यांचे मतदान घेण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रवादी-काँग्रेस -शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कांबळे यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. महेंद्र पठारे, अशोक कंबळे, वैशाली मराठे, विशाल धनवडे, अशा 6 सदस्यांनी मतदान झाले. यावेळी रासने यांना 10 तर, महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कंबळे यांना 6 मते मिळाली.

त्यानंतर हेमंत रासने यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. दीपक पोटे, दिलीप वेडे-पाटील, उमेश गायकवाड, हेमंत रासने, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, हिमाली कांबळे, सुनील कांबळे, प्रकाश ढोरे अशा 10 सदस्यांनी मतदान केले. त्यांनतर हेमंत रासने निवडून आल्याचे नयना गुंडे यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.