Pune : पुणे महापालिकेचे उत्पन्न 10 हजार कोटींपर्यंत जायला हवे – हेमंत रासने

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे उत्पन्न किमान 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जायला हवे, अशी अपेक्षा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 2019 पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 2900 कोटी रुपये जमा झाले आहेत. पुढील 3 महिन्यांत आणखी 1500 कोटी रुपयांची वाढ होईल. साधारण 4200 ते 4300 कोटी पर्यंत हे अंदाजपत्रक जाण्याची परिस्थिती होती. मात्र, रासने यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे.

1 हजार कोटींनी अतिरिक्त उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र महसूल अस्तित्व कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मागील 5 ते 7 वर्षांत महसूल काही वाढत नसल्याचा अनुभव आहे. त्याचा रासने यांनी अभ्यास सुरू केला आहे. जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स, डेव्हलपमेंट चार्जेस हे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. उत्पन्न वाढल्यावर 35 ते 40 प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

दरम्यान, 2019 – 20 चे महापालिकेचे अंदाजपत्रक 6 हजार 775 कोटींचे मांडण्यात आले होते. रासने यांनी 1 हजार कोटींनी उत्पन्न वाढणार असल्याचे सांगितल्याने 2020 – 21 चे अंदाजपत्रक 7 हजार कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे. अमिनिटी स्पेस ओपन लँड, बांधलेल्या वास्तू यामधून महापालिकेला उत्पन्न वाढविता येऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.