Pune : हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने सोमवारी सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत. पुणे महानगरपालिका भाजप कार्यालय नवीन इमारतीचा दुसरा मजला येथे रासने कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके उपस्थित राहणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण जगदाळे, निलेश कदम, दिलीप पवार यांनी केले आहे.

तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फेही स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.

स्थायी समितीत भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार सोमवारी ठरणार असल्याचे बराटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.