Pune : गणेशोत्सव कार्यकर्ता ते पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदापर्यंतचा हेमंत रासने यांचा प्रवास

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक गणेशभक्त कार्यकर्ता ते आज युवा, अभ्यासू, कार्यतत्पर, सर्वसामान्य व प्रगल्भ नेतृत्व ते शहराचे प्रभारी हा त्यांचा प्रवास असाच नेत्रदीपक आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच 1986 -1987 साली विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. या कामासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळालेली शिस्त ‘संघटन मै शक्ती है’ या सूत्रांतून शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आशा सर्वच उपक्रमांतून मित्रमंडळींना सोबत घेऊन कार्य करण्याची ही सवय त्यांची आहे.

सुवर्णयुग बँकेत कार्यरत असताना लेखनिक हुद्यावरून सुरवात रासने यांनी 7 वर्षे संचालक व 2 वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न महापालिकेत मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी सन 2002 साली भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली.

गणेशोत्सव कार्यकर्ता म्हणून सुरू असलेले कार्य व त्यांच्या अष्टपैलू गुणांची दाखल घेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यांची सन 2014 साली विश्वस्तपदी निवड केली. भाजपने 2012 आणि 2017 साली उमेदवारी दिली. 2017 च्या निएडणुकीत पुणे शहरात पुरुषांमध्ये शहरात सर्वात जास्त मते मिळविण्याचा बहुमान रासने यांना मिळाला. यावर्षी स्थायी समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आता ते या समितीचे अध्यक्ष झाले.

पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत असताना प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा उपलब्ध करून देणे, पुण्याचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे सुशोभीकरण व तो मूळ स्वरूपात 7 मजली पुनर्बांधणी करावा, यासाठी पुरातत्व विभागाशी पाठपुरावा, 205 फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणे, ऐतिहासिक नानावडाचे सुशोभीकरण तसेच शहरातील वाहनचालकांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मध्यवर्ती भागातील 7 सिग्नलवर एकूण 20 ठिकाणी कापडी छप्पर, असे अनेक उल्लेखनीय कार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.