Pune : धक्कादायक ! वडगावशेरी येथील नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – वडगावशेरी मतदारसंघात एका नगरसेविकेसह तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. या नगरसेविका आणि तिच्या मुलाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या कोरोनाचे संकट गंभीर होत असताना पुणे महापालिकेचे काही नगरसेवक नागरिकांना थेट मदत करतात. ही मदत अन्नधान्य किंवा इतर स्वरूपाची असते. बऱ्याचदा हे नगरसेवक नागरिकांना मदत करताना त्यांच्यामध्ये मिसळून जात असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. गोरगरीब नागरिकांना जेवण, अन्नधान्य वाटप करताना हे नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह गर्दी करत आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी सावध करणारी आहे.

आपल्या प्रभागांतील नागरिकांशी नियमितपणे संवाद राहावा, त्यांच्या समस्या वेळेत सोडविण्यात याव्यात, यासाठी महापालिकेचे नगरसेवक 24 बाय 7 दिवस उपलब्ध असतात. शिवाय या नगरसेवकांच्या भोवती त्यांचे उत्साही कार्यकर्ते सातत्याने गर्दी करतात. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून नगरसेवकांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.

वडगावशेरी मतदारसंघातील या नगरसेविका आणि तिच्या मुलाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांनी सोशल डिस्टन्स पाळने, हाताला सॅनिटायजर, तोंडाला मास्क लावणे गरजेचे झाले आहे. पुणे शहरात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला आहे. मागील 9 दिवसांत पुण्यात कोरोनाचे दुप्पट रुग्ण झाले आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, दाटीवाटीने राहणाऱ्या भागांत हे संकट आणखी गडद होत चालले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.