Pune : आजपासून एसटीचे तिकीट दर महागले ! बुधवार मध्यरात्रीपासून 10 टक्के भाडेवाढ

1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 20 दिवसांसाठी भाडेवाढ

एमपीसी न्यूज- दिवाळी सुट्टीच्या हंगामामुळे राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात आज, (31 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून 10 टक्के वाढ लागू केली आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीच्या हंगामामध्ये दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी ही भाडेवाढ लागू असणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.

दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळी किंवा इतर गर्दीच्या मोसमात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करतात. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवण्यात येतो आहे. परंतु, आता एसटीनेही महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.