Pune : हिंदूंनाही सन्मान, अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्राचा संकल्प

एमपीसी न्यूज – देशातील हिंदूंनाही सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्राचा संकल्प हिंदु संघटनांनी केला आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात यावर्षीही 27 मे ते 8 जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी 20 मे या दिवशी श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित परिषदेला ते संबोधित करत होते. या पत्रकार परिषदेस हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता मोहनराव डोंगरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर आणि सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव उपस्थित होते.

  • यावेळी सुनील घनवट म्हणाले, गेल्या 7 वर्षांतील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेविषयी मोठी जागृती झाली आहे. या अधिवेशनाला भारतातील 26 राज्यांसह बांगलादेश असे येथून एकूण 200 हून अधिक हिंदु संघटनांचे 800 पेक्षा अधिक हिंदुत्वनिष्ठ अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे 27 आणि 28 मे या दिवशी ‘हिंदु अधिवक्ता अधिवेशन’ होणार आहे. या समवेतच २८ मे या दिवशी प्रथम एक दिवसीय ‘उद्योगपती अधिवेशना’चे ही अधिवेशनाच्या मुख्यस्थळी आयोजन केले आहे’, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनी सांगितले.

  • ‘२९ मे ते ४ जून या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांचे ७-दिवसीय ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होईल. याअंतर्गत सोशल मीडिया’चे महत्त्व लक्षात घेता ‘सोशल मीडिया’च्या क्षेत्रातील धर्मनिष्ठ हिंदु कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्यासाठी पहिल्या एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजनही केले आहे. ही ‘कॉन्क्लेव्ह’ रविवार, २ जून या दिवशी अधिवेशनाच्या मुख्य स्थळी असणार आहे, अशी माहिती हेमंत मणेरीकर यांनी दिली. ‘हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ८ जून या कालावधीत हे अधिवेशन असेल, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी यावेळी दिली.

हिंदु जनजागती समितीचे सुनील घनवट यांनी माहिती देतांना म्हटले, पेट्रोल पंपांवर होणारा भ्रष्टाचार थांबवण्यात यावा, यांसह विविध विषयांवर जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या आठव्या अधिवेशनाद्वारे होईल.

  • या अधिवेशनाला पुणे जिल्ह्यातून ‘युथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक राहुल कौल, माहिती अधिकार सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, हभप. निरंजनशास्त्री कोठेकर, अधिवक्ता निलेश निढाळकर आदी सहभागी होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.