Pune News : पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; धर्मांतर, लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Pune News) यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा.या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाला लाल महाल येथून सुरवात झाली आहे.हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असणार आहे.

आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार भीमराव तापकीर,तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे,निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून 11 वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाल्यानंतर (Pune News) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून साडेआकराच्या सुमारास मोर्चा बेलबाग चोकातून लक्ष्मी रस्त्याला लागला.

या मार्च्यात तरुणाईसह महिलांचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी करण्यात आलेल्या घोषणाबाजीमुळे लक्ष्मी रस्ता परिसर दणाणून सोडला. संपुर्ण रस्ता भगवामय झाला होता. यावेळी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त दिसून आला. मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचणार आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

Mhalunge Crime : रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले

होय मी धर्मवीरच !, गो हत्या मुक्त पुणे, फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन,लव जिहाद मुक्त पुणे असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.