Pune : डॉक्टरचा अॅप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताला अटक; 30 वाहने जप्त

एमपीसी न्यूज- डॉक्टरचा ऍप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून २६ दुचाकी, 3 चार चाकी आणि 1 टेम्पो असा 27 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

शाहरुख रज्जाक पठाण, असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी शंकर कुंभार यांना आरोपी शाहरुख पठाण हा वाहन चोरी करून विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात चोऱ्या केल्याचे कबूल केले.

शाहरुख पठाण हा पूर्वी मेडिकलमध्ये काम करत होता. त्यामुळे त्याने ससून रुग्णालयाचं नाव असलेला अॅप्रन घेतला आणि त्यावर स्वतःच्या नावाची नेमप्लेट लावून तो चोऱ्या करायचा. जेणेकरून चोरी करताना पोलिसांनी पकडले तर डॉक्टर आहे, चोर नाही, असे सांगून निसटता येईल. चोरलेली सर्व वाहने त्याने विकली होती. ती सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.