Pune: अर्थसंकल्पातील अतिआवश्यक कामांसाठी संयुक्त बैठक घ्या- दीपाली धुमाळ

Pune: Hold a joint meeting for urgent work in the budget - Deepali Dhumal पुणे महापालिकेतील आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांना कोणतेही काम करण्याचे आदेश न दिल्याने ते बसूनच आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे म्हपालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पातील अतिआवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

अर्थसंकल्प मान्य होऊन तीन महिने झाले आहेत. पावसाळा तोंडावर असतानाही चालू आर्थिक वर्षातील एकही काम महापालिकेच्यावतीने किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले नाही.

मागील वर्षी दिनांक 25 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहराचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. जीवितहानीही झाली होती. परत तसे संकट होण्याची भीती असल्याचे धुमाळ यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

मुख्य खात्याकडून होणारी ओढ्या – नाल्याची होत असलेली सफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. पुणे महापालिकेतील आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांना कोणतेही काम करण्याचे आदेश न दिल्याने ते बसूनच आहेत.

कामांचा डिएसआर मान्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. सन 2020-21 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पमधील पावसाळी आणि अतिआवश्यक कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.