Pune : अतिवृष्टीमुळे पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी

एमपीसी न्यूज – बुधवारी (दि. 25 ) झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या करिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर सहित पाच तालुक्यातील सर्व शाळांना आज, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश जारी केला आहे.

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी घोषित केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.