Pune : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना एक लाखांची मदत

Home Minister Anil Deshmukh donates Rs 1 lakh to Shantabai Pawar : यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्‍यसंपन्‍न असल्‍याचे दाखवून दिले.

एमपीसी न्यूज – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना 1 लाख रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, या आजी उतारवयातही परिवार चालविण्‍यासाठी काम करतात. त्‍यांना शासकीय योजनेतून योग्‍य ती मदत दिली जाईल.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या ‘भरोसा सेल’मार्फत ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्‍यात आली आहे.

पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्‍याचाही प्रयत्‍न केला जाणार असल्‍याचे सांगून जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव तसेच बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्‍यसंपन्‍न असल्‍याचे दाखवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.