Pune : तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजीनगर (Pune) येथील दंगलीच्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच दरम्यान आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीबाबत भूमिका देखील मांडली.
छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये दंगलीच्या घटना घडल्या आहेत. त्याकडे आपण सर्वांनी गांभिर्याने पाहण्याची गरज असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने भूमिका मांडाव्या.
Pimpri : शहराचा पारा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
तसेच, गृहमंत्र्यांना (Pune) झेपत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.