Pune : शिवसेना नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री निधीला; भाजप नगरसेवकांचे मानधन पंतप्रधान निधीला

Honorarium of Shiv Sena corporators to CM Relief Fund; Honorarium of BJP corporators to the PM Cares Fund

एमपीसी न्यूज : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोचा मुकाबला करण्यासाठी पुणे महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी आपले मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला तर भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान सहायता निधीला मानधन दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मानधन देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे मार्च महिन्यातील मानधन पंतप्रधान निधीला दिले आहे. तसे पत्रच सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.

यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन या संकटाचे निवारण करण्यासाठी झटत आहेत. या संकट प्रसंगी सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मार्च 2020 चे मानधन पंतप्रधान निधीला देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पुणे महापालिकेत भाजपचे 102 नगरसेवक आहेत. त्यामुळे 20 लाख 40 हजारांचे मानधन पंतप्रधान निधीला जमा होणार आहे.

कोरोनाचे मोठे गंभीर संकट असल्याने आर्थिक मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे केंद्र, राज्य किंवा महापालिका असा काही प्रश्न नाही. तसेच पुणे शहरात कोरोनाचे संकट असल्याने नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च करावे, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे, असे सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. हे संकट कमी करण्यासाठी केंद्र, राज्य शासन, स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आम्ही 1 महिन्याचे मानधन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.