Pune : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस, अतिथीगृह, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स बुधवार पासून सुरू : आयुक्तांचे आदेश

या व्यवसायांना त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 33 टक्के क्षमतेसह काही अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे. ; Hotels, lodges, guest houses, malls, market complexes outside restricted areas starting from Wednesday: Commissioner's order

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवासी सुविधा पुरविणारे हॉटेल्स, लॉजेस, अतिथीगृह, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समधील व्यवसाय सुरू करण्यास बुधवार (दि. 5 ऑगस्ट) पासून पुणे महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिले.

या व्यवसायांना त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 33 टक्के क्षमतेसह काही अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे.

जे हॉटेल महानगरपालिकेचे क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरात असेल तर त्याकरिता वापर या पुढेही सुरू राहील. उर्वरित भागांपैकी किंवा उर्वरित 67 टक्के भाग महानगरपालिका क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरू शकेल.

कंटेन्मेंट झोनमध्ये हे सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. व्यवसायिकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये, पार्किंगमध्ये आणि आवारात गर्दी होणार नाही, याबाबत योग्य ते नियोजन करावे. बैठक व्यवस्था व रांगेत उभे राहताना सुरक्षित अंतर राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर खुणा कराव्यात.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राहील. रिसेप्शन टेबलच्या जागेभोवती सुरक्षिततेसाठी काचेचे आवरण असावे.

प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कीनिंगची व्यवस्था करावी, सॅनिटायजर स्टँड उपलब्ध करून घ्यावे, मास्क, हातमोजे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून घ्यावे, ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देताना, बाहेर पडताना QR Code, Online forms, digital payment या साधनांचा वापर व्यावसायिकांनी करावा, कोविड 19 ची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेश द्यावा, ओळखपत्र, प्रवासाची माहिती, आरोग्य स्थिती, असे स्वयंघोषनपत्र भरून घ्यावे, अशा अनेक महत्वपूर्ण सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

65 वयोगट पेक्षा अधिक वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले यांना केवळ आरोग्य विषयक कारणाशिवाय प्रवेश देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.