Pune News : अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी साधला डाव; 53 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, केवळ दहा मिनिटांत चोरट्यांनी कडी-कोंयडा उचकटून घरफोडी केली आहे.(Pune News) चोरट्यांनी घरातील 53 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 29 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार 9 मार्च रोजी रात्री आठ वाजून 20 मिनिटे ते आठ वाजून तीस मिटांच्यामध्ये घडला आहे. 

 

Pune News : पुण्यातून पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या ताब्यात

 

तक्रारदार या शिवनेरी नगर येथील गल्ली नंबर 5 येथे ताज प्राईड या इमारतीत राहतात. दरम्यान, त्यांचा मुलगा समोरील फ्लॅटवर खासगी शिकवणीसाठी गेला होता. त्याला आणण्यासाठी तक्रारदार यांनी लाकडी व सेफ्टी दरवाजाची कडी लावली व मुलाला घेण्यास गेल्या. तितक्यात अज्ञाताने कडी उघडून आत प्रवेश केला.(Pune News)  तसेच, घरातील रोकड, सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार यांना काही वेळात हा प्रकार लक्षात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.