Pune : गृहनिर्माण संस्था स्टॅन्झा लिव्हिंगचा पुण्यात विस्तार

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी गृहनिर्माण संस्था स्टॅन्झा लिव्हिंगने कार्यरत व्यावसायिकांसाठी नवीन अत्याधुनिक राहण्याची जागा सादर केल्या आहेत. पुणे, हैदराबाद, बेंगलोर आणि कोयंबतूर येथे 30+ नवीन अत्याधुनिक जागा विकसित केल्या असून त्यांची एकत्रित क्षमता 10,000 बेड इतकी आहे, अशी माहिती स्टॅन्झा लिव्हिंगचे एमडी आणि सह-संस्थापक संदीप दालमिया यांनी दिली.

कंपनीने कार्यरत व्यावसायिकांच्या जीवनशैलीच्या गरजेनुसार ही स्वतंत्र व्यवसाय लाइन तयार केली आहे. त्याचबरोबर नवीन आणि विद्यमान बाजारपेठांमध्ये आपल्या प्रमुख विद्यार्थ्यांच्या गृहनिर्माण व्यवसायात देखील वाढ केली आहे. स्टॅन्झा लिव्हिंग संकल्पनेमध्ये एंड-टू-एंड मॅनेजमेंट, सर्व्हिस-फोकस, तंत्रज्ञानाने सक्षम राहण्याची व सर्वोत्तम सुविधा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

ग्राहकांना उच्च दर्जाचे लिव्हिंग सोल्युशन्स अनुभवण्यासाठी नाविन्यपूर्ण डिझाइन केलेले निवासस्थान आहे. ज्यामध्ये शेफ-क्युरेटड जेवण, वायफाय, कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण, घरकाम आणि खात्रीशीर सुरक्षितता यांचा समावेश आहे.

अधिक माहिती देताना कंपनीचे सह-संस्थापक अनिंद्या दत्ता म्हणाले की, कार्यरत व्यावसायिकांसाठी स्टॅन्झा लिव्हिंगची सोल्यूशन्स 10 महिन्यांच्या संशोधन आणि नियोजनानंतर विकसित केली गेली आहेत. ज्यामध्ये 3,000 पदवीधर विद्यार्थी, प्रवेश-स्तरावरील कार्यरत व्यावसायिक आणि मालमत्ता मालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

स्थलांतरित काम करणार्‍या व्यावसायिकांसाठी जागा तयार करण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीविषयक आवश्यकतांचा सखोल अभ्यास करण्यात आला. पुणे हे उद्योगांमधील व्यावसायिकांसाठी वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून आगामी काळात विकसित होणा-या या श्रेणीत विस्ताराची योग्य संधी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.