Pune : लोकडाऊन वाढल्याने गुजराण कशी करायची?, मजुरांपुढे प्रश्न; पुण्यात कोरोनाचे संकट होतेय गडद

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी 19 दिवसांचा लोकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे आता गुजराण कशी करायची?, असा सवाल कामगार वर्गांपुढे निर्माण झाला आहे.

शहरातील 50 टक्के जनता झोपडपट्टीत राहते. त्यांचे हातावर पोट आहे. 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लोकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता आपल्याला गावी जायला मिळणार, या आशेने कामगार होते.

पुण्यात कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. दररोज दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आज आणखी 4 जणांचा मृत्यू होऊन रुग्णांची संख्या आता 38 वर गेली आहे.

कोरोना झाल्यावर सोसायटीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तरी योग्य ते उपचार मिळतात. मात्र, झोपडपट्टीत दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांचे काय?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

महिनाभर बंदिस्त राहायचे म्हटल्यावर अवघड होणार असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. जनवाडी, येरवडा, वारजे – रामनगर, तळजाई भागातील झोपडपट्ट्या मोठ्या आहेत.

या ठिकाणी सर्वसामान्य कामगार मोठ्या संख्येने दाटीवाटीने राहतात. त्यांना शहरात राहणे परवडत नाही. काही दिवस दानशूर मंडळींनी लोकांना अन्नदान केले. आता मात्र, आणखी 19 दिवस लोकडाऊनचा त्रास सहन करणे कठीण होणार असल्याची कामगारांची भावना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.