Pune : राज्यात उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेला उद्या मंगळवार (दि. 18) पासून सुरुवात होत आहे अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.

18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये 8 लाख 43 हजार 552 मुले तर 6 लाख 61 हजार 325 मुली आहेत. एकूण 9923  केंद्रावर ही परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.