Pune : बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार

HSC resuilt To Be Declair Tomorrow 16 July at 1 Pm Online

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० ला घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ( गुरुवारी) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज, दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com ,www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थी बारावीच्या सर्व विषयांमध्ये किती गुण मिळाले आहेत हे पाहू शकणार आहेत. शिवाय या निकालाची प्रिंटही ते काढू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.