Pune : शिवजयंती निमित्त बुधवारी अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे, अशी माहिती एम.सी.ई सोसायटीचे सचिव लतिफ मगदुम यांनी दिली. पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक असणार आहे .

एकूण दहा हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होणार असून, मिरवणुकीचे हे 18 वे वर्ष आहे.मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम करणार आहेत. आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग आहे. पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता होईल.

मिरवणूकीत आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी होणार आहेत. ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘ जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.