Pune: पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड कोंडी

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी नियमितपणे (Pune)होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.  मागील दोन दिवसांत सायंकाळी या महामार्गावर पुन्हा एकदा मोठी कोंडी होत असल्याचे वाहन चालक आणि प्रवाशी सांगत आहेत.

पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशी पासून पुढे चिंबळी फाटा, एमआयडीसी फाटा , आळंदी फाटा,  ते तळेगाव चौक , आंबेठाण चौक भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्याने त्रस्त करीत आहे.

Pimpri: यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ उस्ताद मश्कुर अली खाँ यांना, तर ‘युवा पुरस्कार’ बासरी वादक दीपक भानुसे यांना प्रदान

विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांत सायंकाळी सहा नंतर स्पायसर चौक ते कुरुळी फाटा दरम्यान खूप मोठ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.  बराच वेळ प्रवाशी आणि वाहन चालकांना या कोंडीत अडकून पडावे लागल्याची स्थिती पुन्हा एकदा पहावयास मिळाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.