Pune : डेटिंगसाठी ऑनलाइन मुलगी देण्याच्या आमिषाने बारावीच्या तरुणाला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियातील लोकांक्ट (Locanto) या ऍपद्वारे डेटिंगसाठी मुलगी देण्याच्या आमिषाने बारावीत शिकणाऱ्या तरुणाला तब्बल साडेतीन लाख रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा तरुण पुण्यातील औंध परिसरात राहण्यास आहे.

याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण बारावीला शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने लोकांक्ट (locanto) हे ऍप डाउनलोड केले होते. त्याला या ऍपवरून डेटिंगसाठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी त्याच्याकडून वेळोवेळी 3 लाख 64 हजार रुपये घेण्यात आले होते.

इतके पैसे घेतल्यानंतरही त्याला डेटिंगसाठी मुलगी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.